वचन प्रितीचे सां…

वचन प्रितीचे

सांजवेळीला सागरतीरी
तुझ्यासवे मी रमले….
वचन देऊनी प्रितीचे
हात हातात गुंतले….

साक्षीला मावळता भास्कर
रंगांनी भरलेला…...
लाटांवरती किरणांनाचाही
साज तो सजलेला….

विश्वासाने दोन जीवांनी
भावविश्व सजविले…..
सोबत घेऊनी विश्वासाला
हृदय गीत गाईले….

भविष्यातली स्वप्ने सुंदर
नयनांनी पाहिली…..
सुगंधासम तीही पहा
अवतीभवती दरवळली……

मावळतीच्या भास्कराने
आशीर्वाद द्यावा…..
दोघांवरती लाल केशरी
रंग पसरावा…..
??????????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *