आभास हा दिनांक:२५/०७…

आभास हा
दिनांक:२५/०७/२०१९

“आम्हाला हवाय आता
फक्त विकास,विकास”
“जंगले झाली मात्र
आता भकास,भकास”

“सगळीकडे म्हणतात
झालाय विकास, विकास”
“अहो,हा तर निव्वळ
आभास हा आभास”

“सिमेंटची घरे ,शहरे
लांबून दिसतात झकास”
“आम्ही समजतो त्याला
झालाय आमचा विकास”

“दुष्काळ दरवर्षी सर्वत्र
असतोच आता हमखास”
“जीवन सगळ्यांचे होतेय
दिवसेंदिवस मात्र भकास”

“विकासाचा हवाय लोकांना
आभास हा निव्वळ आभास”
“रस्ते दिसायला चकचकीत
हाच तर विकास, विकास”

✍श्री हणमंत गोरे
मुपो:घेरडी, ता:सांगोला,जि:सोलापूर
(©सदस्य,मराठी शिलेदार समूह)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *