बाहुली

इटुकली बिटुकली छोटुकली आहेस तू माझी बाहुली
एवढ्याशा वयात कळत काय गं तुला म्हाताऱ्या आजी सारखीच जीव लावतेस तु मला

तुला पाहिलं की पाहतच रहावं असं वाटतं तुला पाहण्यातच तर जगण्याचं समाधान भेटतं

इवल्याशा चेहऱ्यावर भावना स्पष्ट दिसते
तू काढलेल्याआठवणीची तळमळ तुझ्या शब्दातही असते
इवल्याशा मनात तू प्रेम किती साठवतेस
मी झोपलो तरी मला स्वप्नातही तू आठवतेस

इवल्याशा पावलांचा आवाज काळजाला भिडतो
पप्पा पप्पा म्हणून तुझी हाक ऐकली की
जीव भांड्यात पडतो

तूच माझि माऊलि आणि तूच माझी सावली
इटुकली बिटुकली छोटुकली आहेस तू माझी बाहुली

पहाट

पाच वाजले आलाराम वाजला
कानाला खाज आली वाटले मोबाईल बंद करू
पण हळूहळू धुसर आठवलं
आता नाही उठलं तर आपण असेच मरू

डोळे पुसले शूज घातले
दरवाजा उघडून बाहेर पाहिले
त्या दृश्याने डोळ्याच दिपले

सुंदर असा उशकाल पूर्वेला तांबडे फुटले
नाजूक नाजूक धरती मधून किरण उठले
आकाशाला जाऊन भेटले

पक्षांचा किलबिलाट पानाफुलांचा खळखळाट
मन आनंदाने भरून गेले
दुःख माझे सरून गेले

जगण्यात आता कमीच नाही
येऊ दे आता संकट काहीही

मन माझे खंबीर झाले
पहाटेच्या वातावरणात मोहून गेले
असा आनंद सर्वांनी घ्यावा
पहाटचा देखावा एकदा तरी पहावा
एकदा तरी पहावा

हे सुखकर्ता हे दुखहर…

हे सुखकर्ता हे दुखहर्ता
तू आला आहेस आता
आम्ही बिनधास्त जगतो न घाबरता

दुष्काळाचे चटके सहन केले
या माझ्या महाराष्ट्राने
पाण्यावाचून जनावरे मेलेले पाहिले
या माझ्या महाराष्ट्राने
हात जोडून विनंती करतो थोडा तरी
पाऊस दे देवा तुझ्या कृपाकटाक्षाने

बापाचे डोळे थकले
लेकीचे लग्न यंदाही हुकले
उगवलेले पिक पाण्याला मुकले
मुलां बाळांचे ऍडमिशन चुकले
लेकरांचं ही थोड ऐकून घे
देवा थोडातरी पाऊस दे

जिथे पुराने थैमान घातले
भरलेल घर क्षणार्धात धुतले
माय लेकराची पाटी मोडली
म्हाताऱ्या आजीची काठी काठी मोडली

आता राहायचं कुठं आणि जायचं कुठं
घर नाही दार नाही जनावर नाही ढोर नाही
त्यांना थोडासा आसरा दे देवा
त्यांच्या शेतातही झाल्यात खोल खोल गर्ता
हे सुखकर्ता हे दुखहर्ता तू आला आहेस
आता आम्ही बिन्धास्त जगतो न घाबरता